गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई दहावी व बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला .महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी द्वारे संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल सहस्त्रकुंड तालुका किनवट जिल्हा नांदेड या शाळेचा सीबीएससी बोर्डाचा निकाल घोषित झालेला आहे इयत्ता दहावीच्या निकाल 98.04% तर इयत्ता बारावीचा निकाल 96.08% लागला आहे यात परीक्षेत मुलींनी बाजी मारली इयत्ता दहावीत कु . तेजस्विनी इंगळे 90.20 द्वितीय क्रमांक कु. पार्वता शेळके 78.60 तृतीय क्रमांक अनुष्का बातलेवाड 77.40 व इयत्ता बारावीत कु . क्रांती घोडाम 78 % प्रथम क्रमांक कु.गायत्री कोकाटे 73.04 % कु.अनुष्का आत्राम 71.06 % यांनी घवघवीत यश संपादन केले.इयत्ता दहावी मराठी गणित सामाजिक शास्त्र विज्ञान व कृषी व इयत्ता बारावी मराठी जीवशास्त्र या विषयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे नियमित अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य पर्यवेक्षित अभ्यासिका उजळणी वर्ग वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले व निकाल हा स्पष्ट लागल्याचे शाळेच्या प्राचार्य श्रीमती राधिका गोलटकर यांनी सांगितले. या शाळेसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट मेघना कावली व सहाय्यक प्रकल्प अधिकारी शेळके सर , पालक शिक्षण अधिकारी बोर्डे जोशी यांनी विशेष लक्ष दिले. यामध्ये एकलव्य स्कूलचे शिक्षक श्रीमती ममता जाधव , अरुण मस्कर , निर्मल उत्तरेश्वर ,श्रीमती वर्षा वाघमारे, महादेव शिंदे, सावंत सर , श्रीमती स्नेहा खंदारे , अविनाश जाधव , नंदकिशोर लठाड , गणपत किरवले, बालाजी कन्नाके, निपुण पाचपुते, माधव ढोले, दिलीप ताडेवाड, पुरुष अधिक्षक नागेश लाटकर , स्त्री अधिक्षका विपात्सना सुरडकर, सचिन मंगनाळे व इतर शिक्षक आणि चतुर्थ कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)