दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 21: तालुक्यातील मौजे वडगाव येथे शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मार्फत खरीप हंगाम पूर्व गाव बैठक बोलवण्यात येऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिका मार्फत खरीप हंगाम तृणधान्य असो, कडधान्य असो पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे जसे आपण लहान मुलांवर संस्कार करतो किंवा निरोगीसाठी पल्स पोलिओ चे लस देतो त्याचप्रमाणे पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करणे उत्तम आहे व उपयोगाचे आहे. त्यामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्राचे बचत होते. दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होवून किड व रोगा पासुन मुक्त ठेवण्याचे काम बिज प्रक्रियामुळे होते. तसेच मंदाणा मंडळचे कृषि अधिकारी मनोज खैरनार यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रत्याक्षिक बद्दल संत तुकाराम महाराजांचा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हा अभंग म्हणून शुद्ध बियाणांचे महत्त्व सांगितले. तसेच घराचे किंवा बाजारातून आणलेले बियाणे उगवले नाही तर आपला खतावरचा खर्च, मनुष्या वरचा खर्च संपुर्ण एक हंगाम वाया जातो. कधी कधी आपल्यावर दुबार पेरणीची वेळ येते अशी परिस्थितीत आपल्यावर येऊ नये म्हणून बियाणांची उगवण क्षमता तपासणी करुन जर बियाणे 70% च्या वर ऊगवण क्षमता असेल तरच पेरणी करावी. तसेच कृषि विभागा मार्फत माग्रारोहयो फळबाग लागवड, महाडीबीटी योजना, ठिंबक सिंचन योजना, पी एम किसान योजना, पिक प्रत्याक्षिके अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका, प्रधानमंत्री सुक्षम अन्य प्रक्रिया योजना, आपत्कालीन पीक नियोजन, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी मूलस्थानी साधारण बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे, सरपंच वडगाव दिनेश पावरा, पोलीस पाटील ओकेश पावरा, उपसरपंच विजय सोनवणे, भिका ठाकरे, लगन पावरा, ग्रामपंचायत सदस्य पवन सूळे, आण्णा वळवी, संतोष पावरा आदी शेतकरी उपस्थित होते.