स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : मुंबई येथील नॅशनल एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलमेंट आर्गनायझर या राष्ट्रीय संस्थेतर्फे दरवर्षी विविध श्रेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या वर्षीचा सामाजिक कार्यासाठीचा पुरस्कार दोनद बु!! ता. कारंजा जि. वाशीम येथील शेतकरी कन्या प्रिया अक्षय राऊत यांना जाहीर करण्यात आला आहे असून हा पुरस्कार येत्या शनिवार दिनांक २५ मे २०२४ रोजी. मुंबई येथील हॉटेल कोहिनूर काँटिनेंटल या पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संमेलनामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात उद्योगपती, हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर. शिक्षणतज्ञ उपस्थीत राहणार आहेत . नॅशनल एज्युकेशन ऍण्ड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आंर्गनायाझर या संस्थेतर्फे या पूर्वी चित्रपट अभिनेता, अमिताभ बच्चन, विजय पाटकर, रणजीत, मसाला किंग धनंजय दातार, चित्रपट अभिनेत्री सुश्मिता सेन, जयश्री टी, आसावरी जोशी, सोनाली कुलकर्णी, झी टीव्ही. अशा अनेक मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . प्रिया अक्षय राऊत ह्या कानडी ता. मूर्तिजापूर येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिलीप लोडम यांची मुलगी असून सर्वत्र विदर्भामध्ये तिचे कौतुक करण्यात येत आहे.संकलन सौ. सिमाताई योगेश पवार संस्थापक अध्यक्षा सिमाई आधार फाऊन्डेशन महाराष्ट्र राज्य








