विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: विद्या विकास मंदिर यवत ता. दौंड जि. पुणे या विद्यालयाच्या २००३-२००४ या इयत्ता बारावीच्या बॅचचे वार्षिक स्नेहसंमेलनचा सोहळा रविवार दि.१९ मे २०२४ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य असे होते की तब्बल वीस वर्षांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मुले- मुली एकत्र आले होते.तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्नेहसंमेलनाचे नियोजन ठरले होते या स्नेहसंमेलनाला यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे सर्व मुले आणि मुली अहोरात्र प्रयत्न करत १९ मे २०२४ ही तारीख ठरली मेहेर रिसॉर्ट यवत या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला २७ मुले व २७ मुलींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.तब्बल वीस वर्षांनी एकत्र आलेल्या मित्र मैत्रिणींच्या आनंदाला उधाण आले होते.सकाळी साडेनऊ वाजता सर्व मुले मुली रिसॉर्टला उपस्थित झाले सकाळी चहा नाष्टा या गोष्टी झाल्यावरती दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व मुलांची मुलींची मनोगते अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे व्यक्त केली जात होती त्याचबरोबर सर्वांसाठी लकी ड्रॉ गिफ्ट उखाणे स्पर्धा या सर्व गोष्टी यामध्ये नियोजित होत्या सुप्रिया झुरुंगे, शितल बडेकर, आशा बोरावके, वर्षा लकडे या मुलींच्या उखाण्यांना सर्व विद्यार्थ्यांनी दाद दिली त्याचबरोबर मुलांमध्येही बऱ्याच मुलांनी चांगले उखाणे घेतले संतोष राजगुरू, धवल गांधी, नवनाथ यादव, बापू शेळके हे काही कमी नव्हते मुलींच्या बरोबरीने त्यांनी उखाणे घेतले.त्याचबरोबर सर्व मुलांनी मुलींनी आपली मनोगते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केली त्यामध्ये बरेच भावुक झाले होते मनाला काही शब्द चटका लावून जात होते अनेकांचे डोळे भरून आले होते पण हा आनंदाचा क्षण प्रत्येकाला आपल्या डोळ्यात साचवायचा होता. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मनाला धीर दिला होता, गप्पागोष्टी गाणी वीस वर्ष राहिलेला अबोला आज या मुलांनी पूर्ण करायचा ठरवला होता.त्यामध्ये संगीत खुर्ची गाण्यांच्या भेंड्या डान्स एकत्र स्नेहभोजन या गोष्टींनी आणखीच भर घातली असे वाटतच नव्हते की वीस वर्षे हे मित्र-मैत्रिणी एकमेकांपासून दूर राहिलेले आहेत आणि यांच्यात या वीस वर्षांमध्ये काही खंड पडलेला आहे या गोष्टी पूर्णपणे बाजूला राहिल्या होत्या.सायंकाळचे पाच कधी वाजले या ५४ मित्र मैत्रिणींना कळालेच नाही महाराष्ट्राच्या चारी कोपऱ्यातून ते सर्व एकत्र आले होते पुढचा कार्यक्रम नियोजित होता शाळेमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना गिफ्ट शिक्षकांचा मानसन्मान शाळेला भेटवस्तू या गोष्टीचं नियोजन आयोजकांकडून करण्यात आले होते त्यानुसार सर्वांनी पाच वाजता शाळेमध्ये दाखल होऊन पुढील कार्यक्रम तेथे चालू झाला.प्रथमता या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान माननीय मुख्याध्यापक मासाळ सर यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून स्वीकारले. यावेळी जे शिक्षक हयात नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रज्वलनाने आणि इतनी शक्ती हमे देना दाता की मन का विश्वास कमजोर हो ना हम चले नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल होना या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सोहळ्याचं अजून एक वैशिष्ट्य असं झालं होतं की सोहळ्याला आलेले जेवढे शिक्षक होते ते या शाळेचे आजी माजीमुख्याध्यापक होते. त्यामध्ये कुदळे मॅडम, जगताप मॅडम, सावंत सर, झिटे सर, पोमन सर हे होते. त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक भूपेंद्र शहा सर शिक्षक इतर कर्मचारी बापू तेलंग, कोळी भाऊ यांनी आपली उपस्थिती विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थिती लावली होती.या ठिकाणीही मुलांनी मुलींनी आपली मनोगते अगदी उत्साहात मांडली. तब्बल वीस वर्षांनी शिक्षकांना भेटलेले विद्यार्थी आणि पुन्हा एकदा बारावीचा वर्ग भरलेला भास यावेळी होत होता. सर्व शिक्षकांचेही मार्गदर्शन त्यांची मनोगते ऐकून विद्यार्थी भारावून गेले होते. सर्व शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना कुदळे मॅडम यांनी अतिशय भाऊक होऊन सांगितले की इतक्या वर्षांनी तुम्हा बाळांना एकत्र पाहून माझं हृदय आनंदाने भरून आलेले आहे तुमचे हे यशाचं शिखर अजून अधिकाधिक उंच होत जावे हिमालयालाही तुमच्याकडे पाहून हेवा वाटेल असे यश तुम्हाला मिळावे तुम्हाला जेवढा आनंद आम्हाला भेटून झाला आहे त्यापेक्षाही माझ्या आनंदाला मर्यादा राहिली नाही सर्वजण असेच एकत्र रहा एकमेकांना वेळोवेळी मदत करत जा असा यावेळी त्यांनी आवर्जून संदेश दिला आणि शाळेची कधीतरी जाता येता आठवण काढत रहा असे अगदी भाऊक पणे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व आलेल्या मुला मुलींना प्रत्येकी गिफ्ट देण्यात आले आणि सायंकाळी ग्रुप फोटो काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मुलांमधून नवनाथ यादव,गणेश जराड, बापू शेळके,महेश पाटील,दीपक कदम, दिनेशपाटणे, संतोष राजगुरू, सचिन लाटकर, दीपक मुळीक, शहाजी पकाले,जमीर सय्यद,अजितदेशमुख,विक्रम दोरगे,सुभाष लोंढे,गणेश पवार,धवल गांधी गहिनात पवार, मंगेश भोसले,मंगेश दोरगे,अण्णा दोरगे, सुरेश दोरगे,गणपत खुटवड,संदीप ठोंबरे,राहुल नवले,अरुण जगदाळे, राकेश शेलार, दीपक शेळके इत्यादी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. तर मुलींमधूनशितल बडेकर,नूर शेख, राणी दोरगे,छाया इंगवले,वर्षा दोरगे,वैशाली दोरगे,आशा बोरावके, मेघा काटे सारिकाकळमकर,पदमा चोबे,सुरेखा कडू,स्वाती माळवदकर,कविता दोरगे,ज्योती तनपुरे, कीर्ती गरुड, स्नेहल आल्हाट,रोहिणी दोरगे, वर्षा लकडे,दिपाली शिंदे,लक्ष्मी जाधव ,रूपाली भोंडवे,आशा कदम,सुनिता होले,मनीषा रायकर, सुप्रिया झुरुंगे,सुनिता शिंदे मनीषा वाबळे इत्यादी मुलींनी आवर्जून उपस्थिती लावली या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं ते बापू शेळके, नवनाथ यादव, संतोष राजगुरू, दिनेश पाटणे,महेश पाटील, अण्णा दोरगे, सचिन लाटकर, जमीर सय्यद, धवल गांधी, राकेश शेलार, गहिनीनाथ पवार, अजित देशमुख, गणेश जराड, शितल बडेकर, स्वाती माळवदकर, वर्षा लकडे, ज्योती तनपुरे, आशा बोरावके, सुप्रिया झुरुंगे , सुरेखा कडू, वर्षा दोरगे, रोहिणी दोरगे, दीपा शिंदे, छाया इंगवले मुला मुलींनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जराड व वर्षा लकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष राजगुरू यांनी केले.