योगेश मेश्राम ग्रामीण प्रतिनिधी
माणूस जन्माला आला की, केवळ स्वतःच्या सुखासाठी जगतो मात्र समाजाचे काही देणे म्हणून अनेक जण समाजसेवक स्वतःला झोकवून देतात मनोरुग्णांची सेवा म्हणजे एक आव्हानस आहे.तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील शुभम पसारकर नावाचा देवदूताने आव्हान स्वीकारले आहे. मनोरुग्णांच्या सेवेत स्वतःला झोकावून दिले. शुभम मनोरुग्णाच्या आशेच्या किरण ठरला आहे. त्याच्या या कार्यामुळे जिवंतपणे नारकायातना सहन करणाऱ्या मनोरुग्णांना जगण्याची नवीन उम्मीद मिळाली आहे. दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, अनाथ, निराधार, मनोरुग्ण केंद्र जामगाव भिसी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे त्यांचे केंद्र बनत आहे त्यांना येथे उपचार उपचार मिळेल ,निवारा मिळेल ,खाण्यापिण्याची निशुल्क व्यवस्था मिळेल ,व्यवस्था मनोरंजन कक्ष, समोपदेशन कक्ष , आरोग्य तपासणी कक्ष , औषधोपचार , सुरक्षा व्यवस्था इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवारामधील गरजू लोकांना साधनांची सुविधा , उपलब्ध करुन देनार ट्यूबलाइट, पंखे, वॉश बेसिन, स्वयंपाक गृह, वॉटर प्युरिफायर, सीसीटीव्ही कॅमेरा, रुग्णवाहिका, मनोरंजन साधने, प्रथमोपचार किट , टेलिव्हिजन , कॅरम बोर्ड, चेस , बॅडमिंटन इत्यादी. दोन वेळा चहा सकाळी ७ वाजता सायंकाळी ४वाजता ,एक वेळचा नाश्ता सकाळी ९ वाजता, दोन वर्षात जेवण सकाळी १२ वाजता व रात्री ८ वाजता निवाऱ्यामधील राहणाऱ्या लोकांना निशुल्क गरजेच्या वस्तू टूथपेस्ट , मंजन, साबण , अंतरवस्त्र, बिछायत , चादर , ब्लॅंकेट, तेल, कपडे चप्पल इत्यादी गरजु लोकांना पुरवण्यात येणार आहे . कुठल्या प्रकारचे शासकीय अनुदान नसतानाही दिव्यवंदना आधार फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्र करिता महान कार्य करीत आहे. जामगाव को. भिसी येथे या लोकांच्या हक्काचे निवारा केंद्र बनत आहे. तरी आमच्या या महान कार्यास मदत करावी. भविष्यात सेवेचे नियोजन एका वेळेस 400 बेघर, बेवारस, भिक्षेकरी ,अनाथ ,मनोरुग्ण ,लोकाची सेवा करण्याचा मानस आहे मानसिक आरोग्यबाबत असलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी मोठी जनजागृती मोहीम राबविण्यात येनार आहे विदर्भात कुठेही मनोरुग्ण आढळला शुभम ला फोन येतात . मनोरुग्ण कितीही आक्रमक असो त्याला शांत करून सोबत नेण्याची कला आता शुभम ला चांगलीच अवगत झाली आहे. आजवर शुभमने ४०० हून अधिक मनोरुग्णांना नागपूर येथे उपचारा करीता पाठवले आहे. अनेकांना त्यांच्या घरी सुद्धा पाठवले आहे. दिवाळीनंतर दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षकरी , अनाथ,मनोरुग्ण लोकांना हक्काचा घर देण्याच मानस आहे.