नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रतापराव माने यांचे कनिष्ठ चिरंजीव ऋषिकेश कुंदाताई प्रतापराव माने यांना दिनांक १९मार्च रोजी परभणी कृषी विद्यापीठाकडून फूड टेक्नॉलॉजी ( अन्नतंत्र) या विषयां मधील तृणधान्य पासून पौष्टिक मूल्यवर्धित पदार्थ व त्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याच्या विषयावर प्राध्यापक डॉक्टर राजेश क्षीरसागर सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यामुळे त्यांना नुकतीच पीएचडी ही उच्च पदवी प्रदान करण्यात आली आहेया बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागातील तालुक्यातून शरासारख्या. ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेत आपल्या गुणवत्तेचा ठसा कृषी विद्यापीठ परभणी मध्ये निर्माण करणाऱ्या शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रतापराव माने सर यांचे चिरंजीव ऋषिकेश कुंदाताई प्रतापराव माने यांना अन्न तंत्र महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कडून फूड टेक्नॉलॉजी ( अन्नतंत्र) या विषयां मधील तृणधान्य पासून पौष्टिक मूल्यवर्धित पदार्थ व त्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याच्या विषयावर प्राध्यापक डॉक्टर राजेश क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल संशोधन करून त्यांना डॉ.संजय कुमार मा.अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ नवी दिल्ली , प्रा.डॉ.इंद्र मणी मा.कुलगुरू व.ना.म.कृ.वि.परभणी यांच्या हस्ते नुकतीच पंचविसाव्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आली आहे यावेळी प्रा.डॉ.ऋषिकेश कुंदाताई प्रतापराव माने यांच्या या यशाबद्दल एम. आय. टी. अन्न तंत्र महाविद्यालय, छ. संभाजीनगर येथील संचालक मुनिष शर्मा, प्राचार्य प्रा. डॉ. शैलेंद्र कटके, प्रा. डॉ. श्रुतिका देव, प्रा. डॉ. शीतल गुमटे, प्रा. पूनम पाटील, प्रा. अजीज अन्सारी व अन्नतंत्र महाविद्यालय व.ना.म.कृ.वि. परभणीचे प्रा. हेमंत देशपांडे, प्रा. डॉ. कैलाश गाढे, प्रा. डॉ. भारत आगरकर, प्रा. डॉ. भानुदास पाटील, प्रा. डॉ. गिरीश माचेवाड, प्रा. डॉ. प्रवीण घाटगे, प्रा. डॉ. अनुप्रिता जोशी, प्रा. डॉ. अमोल खापरे प्रा. डॉ. चंद्रलेखा भोकरे, प्रा. डॉ. प्रीती ठाकूर , प्रा. शिवकुमार सोनकांबळे, प्रा. डॉ. नरेंद्र देशमुख, प्रा. डॉ. गोविंद देसाई प्रा. डॉ. सय्यद जुबेर सह हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, व हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक, समस्त माळी समाज बांधव ,सावता परिषदेचे जिल्हा महासचिव शाम ढगे,संघटक सावन रावते, युवा तालुका अध्यक्ष कृष्णा कटारे,संतोष सातव, पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर,नागेश शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या….