मारोती सुर्यवंशी
शहर प्रतिनिधी, नरसी
नरसी: नरसी नगरीचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आसलेल्या श्री खंडोबा देवाचा पंचविसावा वार्षिक महोत्सव दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी खंडोबा देवाचे पुजारी व मानकरी आसणारे गणपती महाराज पाटे नरसीकर यांच्या निवासस्थाना वरुन खंडोबा देवाची पालखी सोहळ्याचे व मिरवणूकीचे आयोजन केले होते आणि हि खंडोबा देवाची पालखी संपूर्ण नरसी नगरीच्या मुख्य रस्त्यावरून यळकोट यळकोट जय मल्हार चा गजर करत शेकडो
वाघे, व वारू चौफेर भंडारा ची उधळण करीत पारंपारिक पोशाख घालून अंगावर शहारे येतात अशा प्रकारे चाबूक मारुन घेतल्या जातात व आपल्या गुरूंच्या हस्ते पण ह्या चाबकाचे वार प्रसाद, म्हणून वा आशीर्वाद समजून अंगावर छेलतात व विशेषतः यळकोट यळकोट जय मल्हार चा जयघोषात तल्लीन होऊन सर्व जाती धर्माचे नागरिक या मिरवणुकीत सहभागी होतात.
हा उत्सव गणपती महाराज पाटे व त्यांचे पुत्र पांडुरंग महाराज पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी.जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, व्यंकटराव कोकणे, पांडुरंग मामा शिरगिरे,नारायण खणपटे,भास्कर कोकणे, गोविंद तुप्पेकर, बालाजी तुप्पेकर हाणमंत मिसे ग्रामपंचायत सदस्य श्याम सुन्दर कोकणे, हणमंतराव कोकणे , राम खणपटे,किशन खणपटे, परमेश्वर लोहगावे, या उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष, प्रल्हाद कुंडकर , उपाध्यक्ष , सचिव परशुराम खांदाजे नरसी नगरीचे पोलिस पाटील इब्राहिम बेग पटेल व समस्त गावकरी आदी मान्यवरच्या सहकार्याने साजरा करण्यात आला.या प्रसंगी मंदिर विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी च्या वतीने उपस्थित सर्व भाविक भक्तांना व परिसरातील नागरीकांनसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
तसेच सायंकाळी विविध प्रकारचे कलाविष्कार , खंडोबा देवाचा जागरण,गोंधळ , कथा आदी मनोरंजनातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.