उल्हास मगरे
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा:राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. इ.स. सन १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न केले.यामुळे प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले त्यात सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा हक्क, म्हणने मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क, ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा अधिकार हे याच दिवशी प्राप्त झाले होते असा हा अनमोल दिवस
येऊ घातलेल्या या दिवसासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष व सचिव तसेच सदस्य यांच्या उपस्थितीत तळोदा येथे दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी ग्राहक दिन असल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्ताने ग्राहक दिनाचे औचित्य साधत नंदुरबार जिल्ह्यात ग्रंथ दिंडीचे नियोजन करण्यात येत असल्याने या कार्यक्रमाला राज्यस्तरीय नेतृत्व व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे प्रत्येक तालुक्यात प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन पर कार्यक्रम आणि ग्रंथ दिंडीची मिरवणूक काढण्याचे नियोजन असल्याने या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने रविवार दि. १० डिसेंबरला दुपारी २.०० वाजता नंदुरबार जिल्हा अध्यक्षा वंदनाताई तोरवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन कल्याणी बाल सदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे, हातोडा रोड,तळोदा, जि. नंदुरबार येथे करण्यात आले. या बैठकीला जिल्हा संघटक प्रा.डी.सी.पाटील, जिल्हा सदस्य उल्हास मगरे,तळोदा तालुका अध्यक्ष कीर्ती लोखंडे,उपाध्यक्ष भगवान माळी, कोषाध्यक्ष भिका चव्हाण,संघटक कैलास शेंडे,सहकोषाध्यक्ष रोशनी पाडवी,सहसचिव दिपक गोसावी,सदस्य मोहन माळी, सुरेश सूर्यवंशी,अकिल अन्सारी,सुरेश सूर्यवंशी,संतोष कुंभार हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मार्गदर्शन व प्रास्ताविक नंदुरबार जिल्हा अध्यक्षा वंदनाताई तोरवणे यांनी केले तर आभार जिल्हा संघटक प्रा.डी.सी.पाटील यांनी मानले.