अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
आज बारा डिसेंबर पूर्ण महाराष्ट्रात लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जयंती पूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे. या निमित्ताने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे संयोजक राहुल जी कारखिले यांनी जयंतीच्या निमित्ताने पाथर्डी पंचायत समिती या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी बाकडे भेट देऊन बसण्याची व्यवस्था छान प्रकारे करण्यात आली यावेळी राहुल कारखेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगदीश पालवे देविदास दहिफळे अभय काका आव्हाड अमोल गरजे मुंजोबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत राजे कराड संजय गर्जे धनंजय बडे व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी पंचायत समितीच्या वतीने राहुल शेठ कारखेले यांचे आभार देविदास दहिफळे यांनी मानले.