कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
समाजातील विविध मान्यवर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित!
संविधान दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा व समाजरत्न पुरस्काराचे आयोजन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता व्यापारी भवन वासवी माता चौक डुबेवार लेआउट पुसद येथे करण्यात आले होते.सर्वप्रथम मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज,यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच २६/११ मध्ये शहीद झालेल्या पोलीस जवान यांना दोन मिनिटाची मौन शांतता ठेऊन मानवंदना देण्यात आली.तसेच संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.मी नेहमीच रिपब्लिकन वार्ता च्या बातम्या बघत असतो ही वृत्तवाहिनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहे हेच प्रमुख वैशिष्ट्ये या वृत्तपत्र तथा वृत्तवाहिनीचे असल्याचे मला समाधान वाटते आज संविधान दिनीच वर्धापन दिन असल्याने रिपब्लिकन वार्ता समूहाच्या सर्व वार्ताहर मुख्य संपादका सह सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो असे प्रतिपादन प्रा. दिनकर गुल्हाने यांनी केले सामाजिक चळवळीतून जनसामान्याचा आवाज रिपब्लिकन वार्ता म्हणून विदर्भात न्याय देण्याचे काम करतो याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रमुख अतिथी डॉ.अनिल आठवले यांनी बोलताना सांगितले.पुसद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण हटाव व सुशोभीकरण व विविध विषयासह ४५दिवसीय उपोषण संदर्भातील बातमीला प्राधान्य देऊन रिपब्लिकन वार्ता न्यूज चैनलने उल्लेखनीय काम केले. याचे सर्व श्रेय राजेश ढोले यांना जाते असे वक्तव्य अध्यक्ष पिठावरून बोलताना दलितांचा कैवारी संपादक,भीमराव कांबळे म्हणाले.यवतमाळ जिल्ह्यातील ६०पुरस्कारार्थीना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार, वाचक,जाहिरातदार यांचे सह महिला बालक जेष्ठ नागरिक यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलिताचा कैवारी, संपादक, भिमराव कांबळे, हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी चे मुख्य संपादक डॉ. अनिल आठवले, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बुध्दरत्न भालेराव, जेष्ठ प्रत्रकार दै.सकाळ प्रा.दिनकर गुल्हाने,से.नि. समाजकल्याण आयुक्त माधव वैद्य ,जेष्ठ साहित्य लेखक विलास भवरे, माजी प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष विठ्ठल खडसे,प्रा.महेश हंबर्डे, स्वागतोउत्सुक कार्यकारी संपादक सलीम सय्यद,उपसंपादक विदर्भ राजेश ढोले,केळापुर प्रतिनिधी हनुमंत लसंते,पुसद प्रतिनिधी कैलास श्रावणे,वि. प्रतिनिधी नाशिक सीनियर एडिटर युवराज हंगेकर,संभाजीनगर जि. प्रतिनिधी अकबर शाह, गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे, पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, देवणी लातूर प्रतिनिधी समीर मोमीन, भोकरदन जालना प्रतिनिधी मजहर पठाण, ज्ञानेश्वर मेटकर, विजय निखाते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रा आर. पी. गवई यांनी केले.