पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील खुमारी टोल प्लाझा शिवारात एका वेब सिरीजच्या शुटिंगची धुमाकूळ बघायला मिळाली.या वेब सिरीजच्या शूटिंगसाठी आलेल्या अभिनेत्यांना बघण्यासाठी टोल प्लाझा परिसरात गर्दी जमली होती.
यात प्रामुख्याने दृश्यम सिनेमात पोलिसांची भूमिका साकारणारे श्री.कमलेश सावन म्हणजेच गायतोंडे साहेब व हास्य कलाकार श्री.देवेन भोजानी यांची उपस्थिती होती.गेल्या २ ते ३ दिवसांपासून टोल प्लाझा परिसरात शूटिंग करत असल्याची माहिती यश निकम यांनी दिली.व शूटिंगसाठी खुमारी टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी मदत केल्याबद्दल यश निकम यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.