अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव ता.29 – अनंतकुमार विश्वंभर याने 22 नोव्हेंबर रोजी सेलू मानवत ते शिरपुर पदयात्रा सुरु केली होती तिची सांगता आज ता 26 रोजी झाली.या पदयात्रे द्वारे ते अंतरिक्ष पार्श्वनाथाकडे कर्माच्यार्याना जुनी पेन्शन योजना लागू करा सामाजिक सलोखा कायम राहिला पाहिजे अंतरिक्ष पार्श्वनाथाचे मूळ दिगंबर स्वरूपात दर्शन झाले पाहिजे आदींचे साकडे घालणार आहेत.अनंतकुमार विश्वंभर मूळचे शिरपुर येथिल रहिवासी आहेत मालेगाव येथील ना ना मुंदडा उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या बिल्डिंग मेंटेनन्स विभागाचे ते विद्यार्थी आहेत. पदवी व पदावित्तर शिक्षण त्यांनी राजस्थान येथील जयपूर येथून घेतले आहे ते सेलू मानवत येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड आहे
जैन धर्माचे तत्वज्ञान व शाकाहाराचे महत्व समजावून सांगण्यासाठी देशात ते प्रवचन करीत असतात.
त्यांच्या या पदयात्रेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो ओळी – अनंतकुमार विश्वंभर


