सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे वैद्यकीय क्षेत्रात धुमाकूळ घालणारी घटना घडली असून पोलीस प्रशासनामध्ये ठाणे शहर कंट्रोल या अंत्यत महत्वाच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या निशा महादेव चव्हाण यांचे सख्खे चुलते ठकसेन उर्फ बाळासाहेब विठ्ठल चव्हाण वय वर्ष 40 वर्ष यांवर डाव्या गालावर गाठ आल्याने आळेफाटा येथील डॉ अमोल डुंबरे यांच्या आळेफाटा येथील मार्केट यार्ड समोरील सी क्युअर हॉस्पिटल मध्ये दि 27 फेब्रुवारी 21 रोजी उपचार सुरु होते.मात्र उपचारादरम्यान त्यांच्यानाका तोंडातून सतत रक्त येत असल्याचे डॉक्टर अमोल डुंबरे यांना निदान न झाल्याने व ट्रीटमेंट मध्ये अनियमितता व हलगर्जीपणा असल्याने बाळासाहेब चव्हाण यांचा दि 1 मार्च 21 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण यांनी ससून हॉस्पिटल मार्फत चौकशी करण्यासाठीचा अर्ज दाखल केला. ससून रुग्णालयाने सी क्युअर हॉस्पिटलच्या डॉ अमोल डुंबरे यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे बाळासाहेब चव्हाण यांना आपला जीव गमवावा लागल्याबाबतचा रिपोर्ट दिल्याने डॉ अमोल डुंबरे यांच्यावर एफ आय क्र 742 नुसार आळेफाटा पोलीस स्टेशन येथे कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करीत आहे. याबाबत फिर्याददार निशा चव्हाण यांनी डॉक्टर व तत्कालीन स्टाफ यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या घरच्या सोबत असा अक्षम्य हलगर्जपणा घडत असेल तर इतर सामान्य नागरिकांच्या उपचाराबद्दल विचार न केलेला बरा. त्यामुळेच आळेफाटा पोलीस प्रशासन सदरहू डॉ अमोल डुंबरेच्या अक्षम्य हलगर्जीपणा प्रकाराबद्दल नक्की काय निर्णय घेणार?? काय कारवाई करणार?? याबाबतची माहिती येणाऱ्या पुढील काळात मिळू शकेल. डॉ अमोल डुंबरे यांना संपर्क साधला असता त्यांनी सदर एफ आय आर बद्दल काहीही माहिती नसले बाबतची माहिती दिली.


