प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.२४ नोव्हेंबर पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या मंजुरीची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून यासंदर्भात बुधवारी दि.२२ रोजी मंत्रालयात उच्च अधिकार समितीची बैठक राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी४.३० वाजता पार पडली. पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये एकूण ९१ कोटी ८० रुपयांचा निधी मंजूर करून मान्यता दिली आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत समितीमधील मुख्य सचिव, उच्च अधिकार समितीचे अव्वर सचिव, प्रधान सचिव, सचिव वित्त, अप्पर मुख्य सचिव, सचिव नियोजन, पोलीस महासंचालक, संबंधित रेल्वेचे महाव्यवस्थापक, विधान परिषद सदस्य अब्दुल्ला खान दुर्राणी, संबंधित विभागीय आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे सहसचिव, व उपसचिव, मुख्याधिकारी देविदास जाधव आदी उपस्थित होते. उच्च अधिकार समितीची बैठक होण्यापूर्वी विधान परिषदेचे आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबा जानी यांनी प्रत्यक्ष नियोजन विभागात बसून सचिव मिलिंद कुलकर्णी, अप्पर सचिव नंदकुमार राऊत मंत्रालय मुंबई यांच्याशी आराखड्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. आराखड्यामधील सुधारणा आराखड्यामधील व्याप्ती शहराच्या अनुषंगाने कशी पाहिजे याबाबत चर्चा करून सदरील सर्व मुद्दे उच्च अधिकार समितीमध्ये मांडले. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन मुख्य सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व आराखडा सविस्तर पाहून मंजूर केला. हे यश म्हणजे पाथरी शहराला मिळालेले कौतुकास्पद यश असल्याचे त्यांनी सांगितले