प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी पाथरी येथील सर्व समाज बांधवांची बैठक झाली .या बैठकीसाठी पाथरी शहरातील बचरे समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जालना येथील आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्याचे ठरले आहे.दि.२८ नोव्हेंबर रोजी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दीपक रणनवरे हे सर्व ब्राह्मण समाजाच्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी अमर उपोषण जालना जिल्हा येथे गांधी चमन या ठिकाणी मंगळवार दि.२८ नोव्हेंबर रोजी अमरण उपोषणास सकाळी ११. वाजलेपासून बसणार आहेत जोपर्यंत सरकार ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित रखडलेल्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार असे दीपक रणवरे यांनी बोलताना सांगितले आज ब्राह्मण समाजाची व ब्राह्मण समाजातील मुलांची परिस्थिती फार हलकीची झालेली आहे आरक्षण नाही नोकरी नाही कुठले कर्ज पण नाही आज खरा गरीब हा ब्राह्मण समाज झाला आहे. असे दीपक रणवरे यांनी आपले मत व्यक्त केले आपले मत व्यक्त करताना दिपक रणवरे यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने .उपोषण केली पण सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. म्हणून ब्राह्मण समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने गांधी चमन जालना येथे उपोषणाला बसत आहेत. विविध संघटना व व संस्था यांच्या वतीने यांना उपोषणापूर्वीच पाठिंबा मिळत आहे. दीपक रणनवरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा नाना प्रकारचे फोन त्यांना ब्राह्मण समाजाच्या तरुणांकडून जात आहेत असे रणवरे यांनी बोलताना सांगितले. या उपोषणास विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रकाश केदारे व तसेच पंचमुखी हनुमान मंदिर सेवाभावी संस्था तालुका पाथरी सर्व बांधवांच्या वतीने पाठिंबा दिला आहे तसेच नरेंद्र मोदी विचार मंच जिल्हा प्रवक्ता यांच्या वतीने पण पाठिंबा देण्यात आलेला आहे. या उपोषणास गट .तट बाजूला ठेवून सर्व समाज बांधवांनी एकजुटीने याच सहभागी व्हावे अशी विनंती दीपक रणवर यांनी सर्व समाज बांधवांना केली आहे. समाजाचे हित लक्षात घेऊन सर्व तरुणांनी समाज बांधवांनी माता भगिनींनी यानी उपोषणास पाठिंबा देऊन आपल्या सर्व मागण्या या आमरण उपोषणाच्या माध्यमातूनसरकारकडून मान्य करून घ्याव्यात असे मत दीपक रणवरे यांनी व्यक्त केले.











