पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
रामटेक तालुक्यातील नगरधन गाव हे ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्वाचे असून तालुक्यात या गावाची विशेष चर्चा आहे.या गावात नेहमीच दिवाळीनिमित्त मंडईचे आयोजन करण्यात येत असते.म्हणूनच यावर्षी सुद्धा नगरधन येथे पाच दिवसीय मंडईचे आयोजन करण्यात आले आहे.
या पाच दिवसीय होणाऱ्या मंडईच्या कार्यक्रमात प्रामुख्याने कुस्तीची आमदंगल, संगीत ऑर्केष्ट्रा, नाटक,कव्वाली,दुय्यम खडा तमाशा,हं.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज यांचा कीर्तन,हंगामा डान्स तर दि.२० नोव्हेंबर ला सायंकाळी गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम करण्याचे आयोजन केले आहे.या होणाऱ्या पाच दिवसीय मंडईचा आनंद सर्वांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.