मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या दीपोत्सवाच्या स्वागतासाठी परळीकर सज्ज झाले आहेत. दिवाळीनिमित्त नवीन कपडे घराची सजावट करण्यासाठी लागणारे साहित्यासह अन्य खरेदीचा जोर सध्या बघायला मिळतो आहे. सोमवार आठवडी बाजारा दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठ मोंढा मार्केट,राणी लक्ष्मीबाई टावर चौक, घरनीकर रोड, बस स्टँड रोड, मेन रोड परिसर ग्राहकांनी तुडुंम भरला होता. दिवाळीच्या सजावटीसाठी आकर्षक असे आकाश कंदील, दिवे, विद्युत रोषणाईसाठी दिव्यांच्यामाळा असे गृह सजावटीचे भरपूर पर्याय व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच दिवाळीत फराळ हा आकर्षणाचा केंद्र असतो. बाजारात रेडीमेड फराळाची मोठी मागणी आहे. बाजारपेठ गृहसजावटींच्या वस्तूंनी सजली आहे. घराला लावण्याच्या तोरणाचे भरपूर पर्याय येथे उपलब्ध झाले असून ग्राहकाचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिवाळीचा सण हा उत्साहात साजरा होत असुन बाजारपेठांसहित नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)