प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि. ६ नोव्हेंबर पाथरगव्हाण बु. येथील सर्व तरुण व ग्रामस्थ यांच्यावतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. गावातील समस्त तरुण मंडळी व ग्रामस्थ यांच्यावतीने आपले गाव सुंदर व स्वच्छ बनवण्यासाठी आपल्या गावातील स्वच्छता करण्याचे कार्य हाती घेतले आहे हे कार्य २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पासून गाव स्वच्छ करण्यासाठी प्रारंभ केला आहे. गावातील नाली सफाई कोरडा व ओला कचरा गावातील गल्ली गल्लीतून सर्व गावातील तरुण आठवड्यातील एक रविवार या दिवशी ग्राम स्वच्छतेचे कार्य करत आहेत गावातील सर्व कचरा गोळा करण्यासाठी भूमिपुत्र बचत गटाचे ट्रॅक्टर व ट्रॉलीचा वापर हा कचरा गोळा करण्यासाठी करत आहेत गावात वर्गणी करून जागोजागी प्लास्टिकच्या कुंड्या ठेवण्यात आलेले आहेत.गावामध्ये फिरून तरुणांनी आपला कचरा सदरील कुंडीमध्ये टाकावा अशी सर्व सूचना दिले आहेत. तरुणांच्या या सूचनांचे पालन गावातील माता भगिनी व सर्व बांधव काटेकोरपणे करत आहेत आपला कचरा रस्त्यावरून फेकून देता हा कचरा कुंड्यांमध्ये नेऊन टाकत आहेत ज्या कुंड्या कचऱ्याने भरलेले आहेत. त्या कुंडीवर कचरा नेऊन टाकल्यानंतर गावातील तरुणांची ज्यावेळेस फेरी त्यावेळेस सर्व कचरा साफ करून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या कोण हा कचरा गावातील स्मशानभूमीच्या जवळील खड्ड्यामध्ये जमा करत आहेत तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की जमा केलेल्या कचऱ्यापासून काही दिवसानंतर प्रक्रिया करून याचे खतात रूपांतर करण्यात येणार आहे हा जमा केलेल्या कचरा वाया न जाता यापासून खत किंवा इतर प्रक्रिया करून कसा उपयोग आणता येईल यावर ग्रामस्थ विचार करत आहेत .गावातील तरुणांनी राबवलेल्या उपक्रमास गावातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तरुणांच्या या उपक्रमामुळे गावातील घाण समूळ नष्ट होत आहे व लोकांचे आरोग्य पण घाणीमुळे धोक्यात येणारे ते पण या उपक्रमामुळे येणार नाही गावातील डास व इतर रोगराई या उपक्रमामुळे लवकरच हद्दपार होईल व आपले गाव सुंदर व स्वच्छ दिसेल असे तरुणांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. लोक वर्गणी मधून बऱ्याच वस्तू विकत घेण्यात आले आहेत .यातकुंड्या, फावडे, कुऱ्हाड, झाडू, व स्वच्छतेचे पावडर, आदिचा समावेश आहे. गावातील तरुणांनी स्वच्छ माझे गाव हा चालू केलेल्या उपक्रम अभिमानास्पद आहे गावातील तरुण उस्फूर्तपणे या उपक्रमास आवर्जून हजर राहत आहेत तरुणाच्या या उपक्रमामुळे सर्व ग्रामस्थ व माता भगिनी समाधानी आहेत.