मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायी सोबत 14ऑक्टो.1956 धम्म चक्र परिवर्तन केलं होतं त्याच 14 ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिन मिलिंद नगर मधील लुंबिनी बौद्ध विहार येथे चांदूर रेल्वे येते साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक बंडु आठवले सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र रामटेके, यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. यावेळी मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या अध्येक्ष तुळसाबाई खवसे, मंगलाबाई वानखडे, कविता नितनवरे, लता गवई, आशा गवई, मीना गवई, जोशना वरठे, पुष्पा वानखडे, सुनंदा गवई मीना आठवले, मैना जोशी, माया वानखडे, कु रुपाली वानखडे, कल्पना वानखडे, अनंता वानखडे, विजय वानखडे, राजेश गवई,अमीन वरठे, देवंद्र मकेश्वर, रमाबाई महिला मंडळ व पंचशील पोर्टिंग क्लबचे सदस्य उपस्थित होते.