मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे शनिवारी१४ऑक्टोबररोजी सकाळी ५ वाजता कार्तिक मास निमित्त अखंड जागृती भजन मांडीचा शुभारंभ व संस्थानचे लहान मंदिरात ‘ ढाल’ बसविण्यात येणार आहे आणि दुपारी ४ वाजता अमावास्या निमित्त ‘चंदन – ऊटीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बाहेर गावावरून भजनासाठी येणारे अवधूत भजन मंडळाकरीता दैनंदिन भोजन, नास्ता आणि चहा ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन दिवस-रात्र भजन पाळींचे ४५ दिवसाचे नियोजन संस्थानने केले आहेत. तरी सर्व भाविक-भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान चे विश्वस्त मंडळाने केले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)