भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,तसेच साने गुरुजी दूध उत्पादक संघाचे संस्थापक,औद्योगिक प्रशिक्षण संस्था शेवगाव संस्थेचे संचालक व राष्ट्रीय शिक्षण मंडळ अहमदनगरचे मा.अध्यक्ष डॉ.त्रिंबक काशिनाथ पुरनाळे हे गोरगरिबांचे डॉक्टर होते असे प्रतिपादन आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय शेवगावच्या उपमुख्याध्यापिका सौ.मंदाकिनी भालसिंग यांनी केले.त्या आज डॉ.टी.के.पुरनाळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.पुढे बोलताना भालसिंग म्हणाल्या की डॉ.टी.के.पुरनाळे यांनी अत्यंत अल्प दरात रुग्णांची सेवा करून माणुसकी जपली.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी,शेतमजूर,गोरगरिबांच्या कल्याणासाठी वेचले.आपल्याला मुलगा नाही याची खंत न बाळगता त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू,माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली कन्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्यावर उत्तम संस्कार केले,असे त्या म्हणाल्या.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य संपत दसपुते,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक सुनील आव्हाड,ज्येष्ठ शिक्षक बाबुराव डमरे,अविनाश भागवत,सहदेव साळवे,प्रमुख पाहुणे म्हणून संस्था प्रतिनिधी अनिल मगर,शशिकांत सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली धोंडे यांनी डॉ.टी.के. पुरनाळे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री ज्ञानदेव कुलट हिने आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ पल्हारे यांनी प्रास्ताविक ज्ञानेश्वर शेळके तर आभार सागर देहाडराय यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

