अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातूर – दि : ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी तळागाळातील शहरापर्यंत आपल्या समस्या घेऊन येऊ शकत नाहीत,अश्या ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ यांच्या संकल्पनेतून जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या न्याय दरबाराला जनतेकडून मोठया प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या दरबारात जनतेच्या विविध समस्या निकाली काढण्यात आल्या.यामध्ये घरकुलाचे प्रश्न, दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न, विधवा महिला, शबरी आवास योजना आदी प्रलंबित प्रकरणे ताबडतोब निकाली काढण्यात आली.तसेच दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली आणि प्रश्न निकाली काढण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा संगीता अढाऊ, उद्घाटक जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, जि.प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, माया नाईक, योगिता रोकडे, तालुका महासचिव शरद सुरवाडे, संघटक राजू बोरकर, सभापती सुनीता अर्जुन टप्पे, उपसभापती इम्रान खान, रेखा इंगोले, निमा राठोड, धर्मा सुरवाडे,अर्जुन टप्पे, काशिनाथ सरदार, राहुल सरदार, विलास घुगे, मुरखान, संजय लोखंडे, राजेश महल्ले, चंद्रकांत तायडे, युवक आघाडी अध्यक्ष सुनील बंड, प्रज्वल तायडे, हर्षल खंडारे, विजय बोचरे, विजय गवई, विजय अवचार, विनय दाभाडे, सुभाष चिपळे, सावित्री राठोड, हिरासिंग राठोड, विनोद देशमुख, संजय नाईक, अविनाश खंडारे, मुक्तार, निखिल इंगळे, राजू तायडे, मुरली क्षीरसागर, किशोर घोगरे, राष्ट्रपाल गवई, चंद्रमणी वानखडे, शैलेश गुडदे, हरिदास माने, जैद भाई, अक्षय उपर्वट आदी मोठया संख्येने उपस्थित होते.


