दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी, जव्हार
पालघर : जिल्ह्यातील स्थानिक आदिवासी पेसा क्षेत्रातील D.ed,B.ed टीएआयटी २०२२ मधील पात्र धारक उमेदवार यांचं बेमुदत आमरण उपोषण दिनांक ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे चालू करण्यात आलं आहे.त्यांच्या तीन प्रमुख मागण्या साठी हे आमरण उपोषण चालू आहे त्यामध्ये त्यांची पहिली मागणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 नुसार D.Ed / B.Ed पात्र भरती प्रक्रियेत सरळसेवेनुसार नियुक्ती करण्यात यावी , तसेच TAIT 2022 नुसार D.Ed / B.Ed उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झालेल्या सर्व उमेदवारांना सरळ सेवा भरती प्रक्रियेत ( पेशानुसार ) सामावून घेण्यात यावं आणि सरळ सेवा अंतर्गत पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदांचे खाजगीकरण करू नये.अशा प्रमुख मागण्यांसाठी हे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलं आहे .अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी TAIT २०२२ यांनी मा. शिक्षण आयुक्तालय पुणे यांचे दिनांक १७ ऑगस्ट २०२३ व २७ सप्टेंबर २०२३ यांच्या शासन पत्रकानुसार पेसा क्षेत्रातील सरळसेवा भरतीनुसार भरती करण्यात यावी. मा. जिल्हा परिषद पालघर कार्यालय दि. ३० ऑगस्ट २०२३ च्या यादीत आम्हा (TAIT) २०२२ पात्र उमेदवाराची कागदपत्र पाडताळणी झाली असून, दि. १८ सप्टेंबर २०२३ यादीत आम्हा पात्र उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे जो पर्यंत आम्हा TAIT २०२२ उमेदवारांना पात्र यादीत समाविष्ट करून पेसा नुसार सरळसेवा भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेत नाही तो पर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरु राहील त्याच्या सोबत एकूण १२ संघटना आदिवासी क्षेत्रातील पाठिंबा देत आहेत. आदिवासी जनजाती संघटना व D.ed,B.ed,TAIT 2022 पात्र धारक उमेदवार यांचं सिस्टमंडळ मंत्रालयात जाऊन मागण्यांच निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहेत असे बोलले.३ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हा परिषद पालघर येथे निवेदन दिले असता कोणतेही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने या बेमुदत आमरण उपोसनासाठी एकूण १७०३ लोक एकत्र आले आहेत त्यामध्ये आज उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांच्या सिस्टमंडळातील नऊ पेशन्ट आता पर्यंत जिल्हा रुग्णालय पालघर येथे उपचार घेत आहेत यामध्ये प्रामुख्याने कैलास खुरकूटे सर यांचा मार्गदर्शनाखाली हजारो युवकांचे उपोषण सुरू आहे.