सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
आळेफाटा :- जुन्नर तालुक्यातील जाधववाडीत गावठी दारू तयार करणारी हातभट्टी आळेफाटा पोलिसांनी उध्वस्त केली असून अमोल मच्छिंद्र बर्डे (रा .जाधववाडी ता .जुन्नर जि .पुणे )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहॆ .याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की ,सोमवार दि ९ सकाळी ८: ००वाजता जाधववाडी गावाच्या हद्दीत कुकडी नदीच्या किनाऱ्यावर हातभट्टी दारू बनवत असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाली .सदर ठिकाणी पोलीस गेले असता बेकायदेशीर रीत्या गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच आपल्या देखरेखीखाली गावठी दारू तयार करण्याच्या उद्देशाने एकूण २००लिटर मापाचे चे ६ निळ्या रंगाचे बॅरल आणि १५लिटर मापाचे ३०पत्र्याचे डबे पोलिसांना आढळून आले.यामध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी रसायन रापत ठेवलेले १६५०लिटर सदर रापत ठेवलेले कच्चे रसायन ज्यामुळे मनुष्याच्या जीवास हानी पोहचेल व त्यास मूर्च्छा येईल असे विषारी कच्चे रसायन केलेले साधन एकूण १, ७२,२०० रूपयांचा प्रोव्हिशन माल त्याठिकाणी पोलिसांना आढळून आले .सदर भट्टी पोलिसांनी उध्वस्त केली .पोलिसांना पाहून आरोपी गेला .सदर आरोपी बाबत आळेफाटा पोलीस स्थानकाचे अंमलदार केशव भागवत कोरडे यांनी फिर्याद दिली असून सदर आरोपी अमोल मच्छिंद्र बर्डे (रा .जाधववाडी ता .जुन्नर जि .पुणे )यांच्या विरुध्द सरकारतर्फे भा.द .वि कलम 328 व मु .प्रो .का .क 65(ख )(ग )प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहॆ .पोलीस निरिक्षक वाय .के .नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो .कारळे अधिक तपास करीत आहॆ .