अनंता पाचपोहर
ग्रामीण प्रतिनिधी, मारेगाव
इस्रोमध्ये वैज्ञानिक नोकरी ही मुख्य नोकरी आहे..इस्रो वैज्ञानिक असणं म्हणजे फक्त उत्तम करिअर नसून एक सामाजिक प्रतिष्ठादेखील आहे या करिअरमधून देशाची सेवा करण्याची संधी मिळते. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. या व्यतिरिक्त इतर भरती देखील होतात. इस्रोमध्ये हे आहात करिअरचे पर्याय..Aerospace Engineering स्पेसेसशिपमधील किंवा उपग्रहांमधील प्रणालीचे एकीकरण आणी कार्यप्रणालीवर नजर ठेवण्याचे कामही एरोस्पेस इंजिनिअरिंग करतात. शिवाय, अत्याधुनिक वैमानिक वाहनांचे डिझायनिंग आणि उत्पादन हाही यातील मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे. Avionics Engineering एव्ही ओनिक्स इंजिनिअरिंग केलेली व्यक्ती नवनवीन डिझाईन्स विकसित करणे आणि त्यांची चाचणी करण्याचे काम करतात. ISRO मधील एव्ही ओनिक्स अभियंते विमान आणि अंतराळ यानाचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे काम सुरळीतपणे सुरु असल्याचे सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही यांच्यावर असते. Geospatial Engineering
भौगोलिक डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्याचा अर्थ लावणे म्हणजे भौगोलिक अभियांत्रिकी ISRO भूस्थानिक अभियंते मॅपिंग, नेव्हिगेशन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचा वापर करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील डेटा गोळा आणि विश्लेषण करण्यासाठी केला जातो. Remote Sending इस्रो रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ उपग्रह आणि इतर रिमोट सेन्सिंग डेटा गोळा आणि विश्लेषण करतात. ते पृथ्वीची जमीन, समुद्र, वातावरण आणि नैसर्गिक संसाधनांबद्दल डेटा गोळा करण्यासाठी ऑप्टिकल आणि रडार सेन्सर वापरतात. हा डेटा हवामानाचा अंदाज, कृषी निरीक्षण आणि पर्यावरणीय मूल्यमापनासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.
कशी होते इस्रोमध्ये वैज्ञानिकांची भरती…इस्रोचे वैज्ञानिक बनणे हा एक उत्तम करिअरचा पर्याय मानला जातो. इस्रोमध्ये वैज्ञानिक होण्यासाठी थेट भरती प्रक्रिया आयोजित केली जाते. इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्ड(ICRB)द्वारे इस्रोच्या विविध अंतराळ केंद्रे आणि विभागांसाठी शास्त्रज्ञांची भरती वेळोवेळी केली जाते. या रिक्त पदांसाठीची अधिसूचना मंडळाने इस्रो वेबसाइटच्या करिअर विभागात शेअर केली आहे.
ही isro.gov.in/Careers वेबसाइट आहे. उमेदवार येथे दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सबमिट करू शकतात.
पात्रता काय असावी?
इस्रोच्या विविध केंद्रांसाठी शास्त्रज्ञ पदांच्या थेट भरतीसाठी, उमेदवारानं भरतीशी संबंधित विषयात किमान 65% गुणांसह BE/B.Tech किंवा इतर कोणतीही पदवीधर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना
(SC, ST, OBC, EWS, दिव्यांग, इ..) केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.