मुंबई : देशातील सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या लाखो तरुण तरुणींसाठी मोठी खूशखबर आहे. भारतीय टपाल विभागात (India Post recruitment 2022) एक लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत.
म्हणूनच आता केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सरकारने देशभरातील 23 मंडळांमध्ये रिक्त पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे आता देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तब्बल एक लाख उमेदवारांना जॉब्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्या पदांच्या किती जागा इंडिया पोस्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार काही पदांच्या जागा खालीलप्रमाणे आहेत.
एकूण जागा
पोस्टमन 59,099 जागा
मेल गार्ड 1445 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 37,539 जागा यासोबतच स्टेनोग्राफरची पदेही मंडळनिहाय मंजूर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र मध्येही या सर्व पदांसाठी जागा रिक्त आहेत.
महाराष्ट्रात किती जागा
एकूण जागा
पोस्टमन 9884 जागा
मेल गार्ड 147 जागा
मल्टी-टास्किंग पोस्ट 5478 जागा
काय असतील पात्रतेचे निकष या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, उमेदवारांनी इंटर किंवा इयत्ता 12 वी पूर्ण केलेली असावी. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा भारतीय टपाल विभागाच्या नियमांनुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे किमान वय किमान 18 वर्षे आणि कमाल 32 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे.


