शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद परभणी यांच्या संयुक्त विदयमाने व गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीच्या वतीने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या तालुका शालेय क्रीडा स्पर्धेची सन 2023-24 या वर्षात क्रीडा स्पर्धेची प्रवेशीका ऑनलाईन पध्दतीने होणार असल्यामुळे खेळाडूची व वेळेच्या आत विहीत नमुन्यात ऑनलाईन सादर करून आपला विविध स्पर्धेतील प्रवेश निश्चित करावा. दि. 17 ऑगस्ट रोजी नूतन विद्यालय सेलू उपमुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. प्रमुख उपस्थितीत चंद्रशेखर नावाडे, मुख्याध्यापक विजयीसिंग राजपूत, यांनी गणेश माळवे तालुका क्रीडा संयोजक, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहेकर, आभार प्रदर्शन किशोर डोके यांनी मानले. बैठकीसाठी सतिश नावाडे, प्रंशात नाईक, राम लगड, शेख सर,यु.आर. झिंजान, प्रभू शिंदे, नितीन खाकरे,संतोष शिंदे,सगीर फारोकी, रामेश्वर कातकडे,मुळी बालाजी, प्रसाद ठोंबरे, सुरज शिंदे, अमर सुरवसे, अमर ठाकूर,आदी क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती. सेलू तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2023 -24 वेळापत्रक (वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले / मुली )1) योगासन 27 ऑगस्ट ,नूतन महाविद्यालय, सेलू
2) बुध्दीबळ 28 ऑगस्ट
न्यू मॉर्डन इंग्लीश स्कूल,सेलू 3,)कुस्ती ,31 ऑगस्ट
नूतन महाविद्यालय, सेलू4)क्रिकेट,1 ते 2 सप्टेंबर नूतन महाविद्यालय, सेलू
5)कॅरम, 4 सप्टेंबर
नूतन महाविद्यालय, सेलू 6 )कबड्डी,7 ते 8 सप्टेंबर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू, रवळगांव रोड.7)बॅडमिंटन, 9 सप्टेंबर तालुका क्रीडा संकुल,सेलू 8)खो-खो 12 ते 13 सप्टेंबर , प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू,रवळगांव रोड.
9) व्हॉलीबॉल18 सप्टेंबर प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू रवळगांव रोड.10) ॲथलेटिक्स
25 ते26 सप्टेंबर ,नूतन महाविद्यालय सेलू


