दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी, रिसोड
दिनांक १५/०८/२०२३ रोजी डॉ. पं. दे . कृ. वि. अकोला. सलग्नित सूविदे फाउंडेशन कृषी महाविद्यालय रिसोड येथे ध्वज सहीता चे पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुविदे फाऊंडेशन कृषी महाविद्यालय रिसोड येथील प्राचार्य डॉ. ए. एम . अप्तुरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन करून राष्ट्राला आजादी का अमृत महोत्सव निमित मानवंदना आणि भारत माता की जय घोषणा देन्यात आल्यात. तदनंतर सन्माननीय श्री.आर.एस.डवरे विशेष तांत्रीक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड यांनी प्रस्तावना पर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कर्मचारी विद्यार्थी व भारत देशाच्या संपूर्ण जनतेला उद्देशून आपले सविधान, निती मूल्य, आणि राष्ट्र प्रेम संदर्भात विचार व्यक्त करून कृषी शिक्षण नविण्यतंम पद्धतीने अमलात आणून प्रत्येकाने आपले आद्य कर्तव्य बजावले तर हीच देशसेवा होईल या पद्धतीने उपस्थित कर्मचारी आणि विद्यार्थी यांना उपदेश केला. डॉ. ए. ए एम. अप्तुरकर प्राचार्य कृषी महाविद्यालय रिसोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. डॉ.पि.जी.देव्हडे, शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा एल. बि. काळे, रा. से. यो . कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. डी. मसुडकर. सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.जी . आर.गोहाडे व इतर शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. श्री. डवरे सर यांनी आपले प्रामाणिक कर्तव्य , आणि संस्थेप्रती आपुलकी येवढं जरी प्रत्येक कर्मचारी बांधवांनी बजावले तर खऱ्या अर्थानी देशसेवा घडली घडली असे प्रतिपादन या स्वातंत्र्यदिनाच्या शुभ प्रसंगी व्यक्त केले. ध्वजारोहण नंतर आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा, सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक नाटिका देशभक्ती पर, गीत गायन स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य इत्यादि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नियोजन पासून प्रतेक्ष अमलात आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमूख प्रा. जी. आर. गोहाडे, प्रा.के.वानखडे विकास जोगदंड आणि पवन राठोड ज्ञानेश्वर देशमुख, कु . वैष्णवी ढोरे,आणि सम्पूर्ण राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे मोलाचे योगदान लाभले.