सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : नांदगाव शहरानजीक असलेल्या श्रीरामनगर ग्रामपंचायत येथे आ. सुहास कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आज करण्यात आले.आज या ठिकाणी घंटा गाडी, ग्रीन जीम, लहान मुलांसाठी खेळणी, सौर ऊर्जा प्रकल्प या विकास कामांचे लोकार्पण, तसेच काँक्रीट रस्ता चे भूमीपुजन आ. कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे होते. मंचावर छत्रपती पुरस्कार विजेते श्री.विष्णू निकम सर, माजी सभापती सूमन निकम, सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सौ शुभांगी महाजन, सदस्या सौ कमल राऊत, सदस्या सौ नंदा खैरनार, माजी नगराध्यक्ष प्रदीप कासलीवाल उपस्थित होते. प्रास्ताविक श्री विष्णू निकम सर यांनी केले , सूत्रसंचालन व आभार ग्रामसेवक अतुल सोनवणे यांनी केले. या प्रसंगी माजी सभापती सुधिर देशमुख, शहर प्रमुख सुनिल जाधव, अतुल निकम, सदस्य सागर राऊत , सदस्य शुभम महाजन , वाल्मिक राऊत, सुधाकर राऊत, पप्पू महाजन, विजय महाजन, बाळू चौले, नंदकिशोर शर्मा आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.