माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर: डॉक्टर्स असोसिएशन मधील सर्व डॉक्टर्स यांनी जिंतूर येथील रहिवासी शेख हसनैन शेख मुंतजीर या रक्ताचा कर्करोग असलेल्या नऊ वर्षाच्या मुलास पुढील उपचारासाठी नगद ४० हजार रुपयांची आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकी जपत समाजाप्रती एक उत्तम संदेश दिला .शेख हसनैन हा अवघ्या ६ महीन्याचा असतानाच त्याचे मुंबई येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये रक्ताचा कर्करोग म्हणून निदान झाले त्यावेळेस पासून आज त्याच्या ९ वर्षापर्यंत त्याला दर पंधरा दिवसाला नियमितपणे रक्त चढवुन घ्यावे लागते परंतु आज त्याच्या आजाराची तीव्र अवस्था झालेली असून ( Thalecemia Major ) त्याला पुढील उपचार बोनमॅरो ट्रान्सप्लॅाट करण्यासाठी श्री भगवान महावीर हॉस्पिटल , बंगलोर येथे जायचे असून त्यांना उपचारासाठी सर्व खर्च 14 लाख रुपये व इतर खर्च लागणार अवाक्या बाहेरचा खर्च व रुग्णाची जेमतेम आर्थिक परिस्थिती बघून जिंतूर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शिवप्रसाद दत्तराव सानप व मार्गदर्शक यांनी सर्व डॉक्टर्स यांना आवाहन करून फुल न फुलाची पाकळी या माध्यमातून नगद रोख रक्कम ४० हजार रुपये तात्काळ जमा करून रुग्णास सुपूर्द केली . ही आर्थिक मदत करुन या गंभीर आजाराच्या रुग्णाला जीवनदान देण्यासाठी डॉक्टरांचे कर्तव्य पार पडून असोसिएशनने समाजाप्रती उत्तम संदेश दिला आहे या सहकार्याबद्दल सर्व सामाजिक स्तरातून जिंतूर डॉक्टर्स असोसिएशनचे कौतुक होत आहे .हा कार्यक्रम काल धन्वंतरी चिकित्सालयात दु ४ वा. पार पडला यावेळी अध्यक्ष डॉ. शिवप्रसाद सानप व मार्गदर्शक डॉ विक्रम परीहार , डॉ दुर्गादास कान्हडकर , डॉ. देवराव क-हाळे , डॉ . संतोष घुगे , डॉ विजय बुधवंत , डॉ . अतुल जाधव , डॉ .इरफान आगाई पटेल, डॉ.बाळासाहेब घुगे , डॉ परमेश्वर कांगणे , डॉ गजानन जाधव , डॉ जुनैद खान पठाण , शेख मुंतजीर उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. भारत लहाने, डॉ . निखिल गायकवाड , डॉ . ज्ञानेश्वर माघाडे , डॉ. परमेश्वर गोरे , डॉ योगेश तुरे , डॉ. शैलेश मंत्री, डॉ. संदीप काळेगोरे , डॉ भागवत सांगळे, डॉ. नारायण नागरे , डॉ अविनाश चवंडके , डॉ . नितिन घुगे , डॉ . जिशान पठाण , डॉ. धनंजय घुगे , डॉ सचिन जायभाये, डॉ जयंत हाके , डॉ . प्रविण थोरवे यांनी अथक परिश्रम घेतले .










