सय्यद जुल्फेखार अली
ग्रामीण प्रतिनिधी, बीड
नेकनूर : राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले अस्ता ते परळी येथून मांजरसुंबा कडे जात असताना नेकनुर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले व यावेळी जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटच्या कोट्यावधीच्या घोटाळाप्रकरणी नेकनुर आणि परिसरातील ठेवीदारांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ना. धनंजय मुंडे यांनी ठेवीदारांचे निवेदन स्वीकारून शासन स्तरावर याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय नेते कर्तव्यदक्ष कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे परळी वरुन मांजरसुंबा कडे जात असताना नेकनुरच्या बसस्थानका समोर कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर आपला ताफा उभा करून थांबले या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत करत घोषणा दिल्या यावेळी जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या वतीने व विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार विरुद्ध व विजेच्या विविध मागण्यासाठी नेकनुरच्या शेतकऱ्यांच्या वतीने असे वेगवेगळे निवेदन देण्यात आले आहे.जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटच्या २०० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी शासनस्तरावर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असे आश्वासन दिले आहे.या निवेदनावर ,साहेबराव खिंडकर, विक्रम शिंदे, दिपक कदम, पांडुरंग जाधव, श्रीराम सावंत, गणेश काळे, बाळासाहेब वाघमारे, किशोर घोडके, मोहन देवगुडे, किशोर काळे सह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते सय्यद मोहिब भाई, शिवाजी शिंदे, सय्यद खालेद पत्रकार, ईजहारोदीन जहागीरदार, शामसुंदर शिंदे, किशोर कांकर, सुंदर लांडगे, अनिल निर्मळ, विजय निर्मळ, हत्तु दादा, शेख शाहेर जागीरदार, लादेन पाशा, सय्यद अथर, सागर शिंदे, आदी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)