संजय भोसले
तालुका प्रतिनिधी, कणकवली.
कर्ली नदीवर बहुप्रतिक्षित नाबार्ड अंतर्गत मोठ्या ब्रिजचे काम सध्या पूर्णत्वाकडे झुकले असून या ब्रिजला लागून असलेल्या ,व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या काही अंतरावर असणाऱ्या, सखल भागात जोड रस्त्यासाठी टाकलेला भराव व मोरीचे पाईप वाहून गेल्यामुळे ,येथील स्थानिकांना या मार्गावरून ये जा करताना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे .यामुळे ग्रामस्थात तीव्र नाराजी पसरली आहे .वास्तविक पाहता येथील भौगोलिक परिस्तिथीचा विचार करता आणि सकलभागाचा अंदाज न करता सिमेंट पाईप टाकून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा पूर्वीच विचार केला गेला पाहिजे होता. पण तसा विचार कुठेही केला नसल्याचे लक्षात येते. यामुळे 20 जुलै 2023 ला आलेल्या महापुरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांचे सर्व दावे फोल्ड ठरलेले आहेत. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद धोंड व परशुराम नार्वेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी चे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांना निवेदन दिले. तर्सेबांबर्डे पंचक्रोशीतील लोकांसाठी पूरस्थितीत इथल्या ब्रिजला लागून असलेल्या सखल भागात किमान 20 मीटर लांब व 10 ते 12 फूट उंच असणारा बॉक्सवेल बांधणे आवश्यक आहे. आणि असे झाले तर पावशी, साईमंदिर, इंगळी येथे तसेच साळगाव, पायरोबा मंदिर येथील काॅजवेवर पाणी असताना देखील पंचक्रोशीतील ग्रामस्थ तर्सेबांबर्डे येथील ब्रिजवरून विना अडथळा दळणवळण करू शकतील. आणि असे झाले तर हा ब्रिज खऱ्या अर्थाने पूर परिस्थितीत इथल्या लोकांचा संकटकालीन मार्ग ठरेल .यामुळे सदर बॉक्सवेल मंजूर होणे अत्यंत आवश्यक आहे. असे प्रसाद धोंड व परशुराम नार्वेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड व कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोवेकर यांनी सदर बाब विचाराधीन असल्याचे सांगितले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)