भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांचे सन २०२१-२२ चे उसाचे पेमेंट मधून कपात केलेली प्रतिटन १०९/- रु ही रक्कम जनशक्ती विकास आघा डीने दिलेल्या लढ्यानंतर शेतकऱ्यांनी खात्यावर जमा झाल्याची माहिती अँड शिवाजीराव काकडे यांनी दिली.अँड डॉ काकडे म्हणाले की,ज्ञानेश्वर कारखान्याने सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्याकडून प्रतिटन १०९/-रुपये अनधिकृतपणे पेमेंटमधून कपात केली होती.ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी ऑक्टोबर २०२२ रोजी भातकुडगाव येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात कपात झालेली रक्कम परत मिळावी यासाठी मागणी केलेली होती.तसेच शहरटाकळी येथील शेतकरी भागचंद कुंडकर,सुनील गवळी,भाऊसाहेब राजळे,मनोज घोंगडे यांचेसह जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण केले होते.त्यावेळी साखर संचालकांनी तोंडी आश्वासन दिले होते.त्यानंतर जनशक्तीने प्रादेशिक सहसंचालकाकडे कपात केलेल्या रकमेची मागणी केली.यावेळी कारखानदार व तक्रारदार यांचे जबाब घेण्यात आले होते.रक्कम परत करता येणार नाही ती ठेवीत वर्ग केली व जनरल मीटिंगमध्ये तसा ठराव कारखान्याने घेतला असा बचाव कारखान्याने सदर केसमध्ये केला.तर तक्रारदार शेतकऱ्यांच्या वतीने अँड डॉ शिवाजीराव काकडे यांनी स्वत केस चालवली व शेतकऱ्यांचे उसाचे एफ आर पी मधून परस्पर कपात करता येत नसतात. कारखान्याने ऊस नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या सह्यांचा गैरवापर केलेला आहे. करारनामा सुद्धा जनरल आहे. स्वतंत्रपणे करारनामा केलेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्येक पानावर सह्या नाहीत असे अनेक मुद्दे प्रभावीपणे मांडले व त्यांचा निकाल दि २५/०५/२०२३ रोजी प्रादेशिक सह संचालकांनी शेतकऱ्यांचे कपात केलेले रुपये १०९ परत देण्याचे आदेश कारखाना प्रशासनास दिले होते.आता त्याची अंमलबजावणी कारखान्याने केली आहे.सदरची रक्कम ही शेतकऱ्यांचे खात्यावर जमा झालेली आहे.यांची रक्कम मिळाली नसेल त्यांनी जनशक्ती कार्यालयाकडे संपर्क करावा असेही काकडे यांनी म्हटले आहे. त्यावेळी जगन्नाथ गावडे,सुरेश चौधरी, भागचंद कुंडकर,भाऊसाहेब राजळे, वैभव पुरनाळे,सुनील गवळी यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
चौकट :मला या निर्णयाने ३४ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे माझे बियाणे,खते यांचा खर्च भागला. अन्यथा मला लोकांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागले असते.त्यामुळे अँड डॉ शिवाजीराव काकडे व सौ हर्षदाताई काकडे यांचे मी मनापासून आभार मानतो.कृष्णा गवळी, शेतकरी शहरटाकळी.
चौकट: येथून पुढे तरी कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांवर अन्याय करू नये.अशी शेतकऱ्यांची लूटमार करू नये.शेतकरी घाम गाळून उत्पन्न घेतात त्यांचे पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार अँड डॉ शिवाजीराव काकडे व सौ हर्षदाताई काकडे यांनी उघडकीस आणला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.राजेंद्र भानुदास खंडागळे ग्रा.प.सदस्य,शहरटाकळी.