बबनराव धायतोंडे
पुणे जिल्हा प्रतिनिधी
दौंड : एकमेकांना भेटा, विचारपूस करा,आपलुकी जपा ,नाते संबंध जपा,सर्वांना प्रेमाणे बोला, घरात मोठ्या व्यक्तींचा मान ठेवा, हीच खरी काळाची गरज आहे त्याशिवाय काही खर नाही..
पूर्वी गाव छोट,घर छोट,घरात वस्तू कमी, पैसा कमी त्याच्यामुळे हमखास तंगी.उसनंपासनं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता.तरीही मजा खूप होती ! उसनंपासनं करावंच लागायचं.साखर,चहा-पत्ती, गोडेतेल, कणिक,मिठ,पिठ या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसणे मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता.त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे, असं आम्हाला कधी वाटलंच नाही. उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा कमीपणा वाटत नव्हता.डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृतांजनचं एक बोट उसनं मागायलासुद्धा अजिबात लाज वाटत नव्हती. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी १० पैशांचा तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताट असायची कोणतीच गोष्ट कोणापासून लपूनही राहत नव्हती आणि तसा प्रयतनही फारसा कोणी करत नव्हत.गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पाहायला येणार, ही बातमी लपून राहूच शकत नव्हती.कारण शेजारी पाजारी पोह्याच्या प्लेट, गादीचे तक्के,बेडशीट, चमचे,कान असलेले कप आदी साहित्य मागून आणल्याशिवाय पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊच शकत नव्हता.आणि मित्रहो,हीच खरी श्रीमंती होती.ते आता कळतंय.आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही. जेव्हा स्टेट्स वर डान्सचा व्हिडिओ येतो तेंव्हा कळतं अरे लग्न झालं वाटत हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे…. भेटत राहा,बोलत राहा, जाणे-येणे ठेवा,विचारपूस करा,जेवलास का,झोपलास का,काही दुखतयं का, असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा, काळजीचा,आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो.
माणसांशिवाय, गाठीभेटी शिवाय संवादाशिवाय काही खर नाही..आयुष्य कमी कमी होत चाललंय सर्वांनी एकमेकांचे संबंध जपा आपुलकी वाढवा आयुष्य फार सुंदर आहे त्याचा मनमुराद आनंद द्विगुणित करा.ह्या सर्व जुन्या आठवणी जपल्या पाहिजेत असे विचार व्यक्त केले आहेत विशेष म्हणजे युवा नेते उत्तम आप्पा आटोळे मा.उपसभापती पंचायत समिती दौंड पुणे यांनी.