संतोष भरणे
इंदापूर ग्रामीण प्रतिनिधी
कळस तालुका इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात संपन्न सर्वप्रथम पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये लहान मोठे सुमारे दीडशे मल्लांनी हजेरी लावली होती यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती एक लाख 51 हजार रुपये इनामाच्या कुस्तीसाठी श्रीमंत भोसले विरुद्ध जमीर मुलानी अशी लढत झाली या लढती मध्ये भोसले याने मुलानी याला हफ्ते डावावर विजय मिळवला हा कुस्त्या आखाडा पाहाण्यासाठी कुस्ती प्रेमी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तसेच मुला मुलींच्या अनेक प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या या कुस्ती मैदानासाठी वस्ताद हनुमंत पवार काझड वस्ताद प्रताप खोमणे महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद दत्ता गायकवाड भिगवन शरद खारतोडे विजय खर्चे नवनाथ खारतोडे गणेश सांगळे यांनी परिश्रम घेतले.
या कुस्ती मैदानासाठी वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे साहेब कर्मयोगी सहकारी साखर कारखाना माजी संचालक ह.भ.प.बाबा महाराज खारतोडे माझी सरपंच गणेश सांगळे तुकाराम खाडे लतीफ मुलानी सिताराम खारतोडे निवृत्ती गायकवाड विलास खारतोडे सुरेश पानसरे शामराव धायतोंडे विजय गावडे धनाजी खारतोडे प्रताप खारतोडे रमेश खारतोडे दयानंद सांगळे उपस्थित होते.
संयोजक अनिल खारतोडे युवा मंच व जनसेवा प्रतिष्ठान व राजमाता ग्रुप यांनी उपस्थितांचे स्वागत केले समालोचन प्रवीण ठवरे व प्रा. दादासाहेब खारतोडे यांनी केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)