बंकटी हजारे
तालुका प्रतिनिधी. माजलगाव
माजलगाव तालुक्यातील तालुक्यातील टाकरवण येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थायानी दहावी परिक्षत घवघवीत यश मीळवले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणुन तपेश्वर अर्बन बॅकेच्या वतीने दि.5 जुन रोजी पालकासह विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
सविस्तर वृत्त असे कि नुकताच दहावीचा निकाल लागला असुन टाकरवण येथील माध्यमिक डे विद्यालयातील विद्यार्थ्यानी यात घवघवीत आसे यश प्राप्त केले आहे.या विद्यार्थ्यासह पालकाचे मनोबल वाढवण्या करता तपेश्वर अर्बन बॅकेच्या वतीने शाल श्रीफळा सह तपेश्वराची प्रतिमा देत त्यांचा भव्य असा सत्कार केला यावेळी प्रथम क्रमाक मिळवणारा विशाल वराट ,पालक मनोहर वराट,शिवाजी कोरके,अशोक गायकवाड तपेश्वर बॅकेचे चेअरमन शैलेष तौर,मुख्यकार्यकारी अधिकारी दादासाहेब तौर,नारायण वराट,गणेश बोबडे,राजु भिंसे सह सर्व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.