तिरुवनंतपुरम : देशात अनेकदा विमानतळावर सोने तस्करीच्या (Gold Smuggling) घटना उघडकीस येतात. सोनेतस्करीसाठी अनेक वेगवेगळ्या शक्कल लढवणारेही महाभाग असतात. मात्र, केरळमधून अशीच एक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने चक्क तीच्या अंतर्वस्त्रामध्ये लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिच्या कडून एक कोटींच सोनं जप्त केलं असून तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. केरळमधील कोझिकोड विमानतळाबाहेर ही घटना घडली आहे. तरुणी तिच्या अंतर्वस्त्रामध्ये लपवून ठेवलेले एक कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत, मलप्पुरमचे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. शहला असे या तिच नाव असून ती कासारगोड येथील रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं?
कस्टम अधिकाऱ्यांनी तरुणीला पोलिसांनी विमानतळाबाहेर ताब्यात घेतले. मात्र, मुलीची तपासणी केली तेव्हा ती सहकार्य करत नव्हती. त्यनंतर, तिच्या कपड्यांची तपासणी केली असता, तिच्या आतील कपड्यांमधील तीन पॅकेटमध्ये सुमारे 1,884 ग्रॅम सोने लपविल्याचे आढळून आले. या सोन्याची किंमत एक कोटी रुपये आहे.
पोलीस खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेत आहेत
मुलीच्या तपासणी करण्यात आली असता तीन पॅकेट तिच्या अंतर्वस्त्रामध्ये लपवून ठेवलेल्याचे निर्दशनास आले. मात्र, पोलिस आता तिची कसून चौकशी करत असून, तिच्याकडे हे सोने कुठुन आले. कुणी तिला सोन्याची तस्करी करण्यासाठी आमिष दाखवलं होतं या सगळ्या बाबींचा शोध घेणारा आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या खऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.