कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन कोकण संपर्क दौऱ्याची सुरुवात केली. लवकरच पश्चिम महाराष्ट्र संपर्क दौरा करणार असल्याचे सांगून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी त्यांचे स्वागत केले. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.