मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. न्या. राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटले, प्रकरणाशी संबंधित मालमत्तेची मूळ मालक मुनीरा प्लम्बरने दिलेला जबाब व न्यायालयात सादर केलेले पुरावे परस्परविरोधी आहेत. तरी तिचा जबाब पूर्णतः बाजूला ठेवता येणार नाही.


