कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील अपघातात जखमी झालेल्या मातेचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नसल्याने चार वर्षांच्या मुलाला कोणाच्या ताब्यात द्यायचे, अशी पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे. गोकुळ शिरगाव येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव जाणार्या मोटारीने धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलासह माता गंभीर जखमी झाली होती. बेशुद्ध अवस्थेत महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाकडून नाव, गाव अथवा नातेवाईकांची माहिती मिळू शकत नव्हती. डोक्याला इजा झाल्याने महिलेची प्रकृती दिवसेंदिवस अस्वस्थ बनत होती. दुपारी दोन वाजता मातेचा मृत्यू झाला.

