वाशिम : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ही घटना 10 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अब्दुल जुबेर, अब्दुल वाजीद, भगवान वाकुडकर, नितीन कावरखे या चार संशयित आरोपींना अटक केली आहे. परंतु प्राणघातक हल्ला करणारा मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पोलिसांनी अनेक पदाधिका-यांची चौकशी सुरू केली आहे. मुख्य आरोपी सापडल्यांनतर हा हल्ला कोणी आणि का केला उघडकीस येईल, असे पोलिसांनी सांगितले.