कानपूर, 11 ऑगस्ट : असं म्हणतात जर कोणाला प्रेमाचं वेड लागलं तर तो काहीही करू शकतो. मात्र जर हे प्रेम अवघे 20 दिवसांचं असेल तर तुम्ही काय म्हणाल? काही दिवसांपूर्वी अशीच एक हत्येची घटना समोर आली आहे.
जी घटना पाहून पोलिसही हैराण झाले. या मुलीने दोघांची हत्या केली होती आणि मृत व्यक्ती इतर कोणी नसून त्या मुलीचे आई-वडील होते. या मुलीच्या प्रियकरानेच तिच्या आई-वडिलांची हत्या केली. या दोघांची ओळख अवघ्या 20 दिवसांची होती.
त्या दिवशी सकाळची वेळ होती. घरातील एका वयस्क दाम्पत्याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही हत्या जितकी भयंकर होती, तितकच त्यामागील कारस्थानही भयंकर आहे. जे पाहून लोक हैराण झाले.
रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी भावाकडून बहिणीची हत्या; तिचं गच्चीवर फिरणं आवडत नव्हतं म्हणून…
निवृत्त सरकारी कर्मचारी मुन्नालाल (61) आणि त्यांची पत्नी राजदेवी (55) आपली मुलगी कोमल आणि मुलगा अनूपसह राहत होते. मुलीच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे मुलाच्या लग्नानंतर वाद झाल्याने त्याची पत्नी घर सोडून निघून गेली होती. यादरम्यान 5 जुलै रोजी वयस्कर दाम्पत्य आपल्या खोलीत मृतावस्थेत होते.
या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात परिसरात रोहित नावाच्या तरुणावर संशय आला. रात्रीच्या वेळी तो त्यांच्या घराच्या दिशेने जाताना दिसत होता. पोलिसी खाक्या दाखवताच रोहितने आपला गुन्हा कबुल केला.
प्रियकरासाठी परिवारासोबत बंड, लग्नानंतर तीन वर्षात तरुणीसोबत धक्कादायक कृत्य
रोहित हा मृत दाम्पत्याच्या मुलीचा दुसरा प्रियकर होता. कोमलचा पहिला प्रियकर रोहितचा सख्खा भाऊ होता. जो आर्मीमध्ये असून मुंबईत तैनात आहे. कोमलचे कुटुंबीय तिच्या या नात्यामुळे नाराज होते. मात्र आई-वडिलांच्या हत्येनंतर भाऊ सर्व प्रॉपर्टी घेईल या भीतीने तिने रोहित आणि राहुल यांच्यासह मिळून तिघांच्या हत्येचा प्लान आखला.


