अविनाश पोहरे / पातूर
पातुर शहरातील रहिवासी असलेले पातुर तालुका विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांचा आज कोरोना योद्धा म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते पिंपरी चिंचवड शहरात सन्मान करण्यात आला.
आपली व आपल्या कुटूंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या जन्मभूमीतुन कर्मभूमी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी खासगी कंपनीत खुप मेहनत व काबाडकष्ट करून आपला संसार उभारला.नोकरी करता करता त्यांनी स्वत:चा लघुउद्योग चालू केला हे सर्व करत असतांना जन्मजातच अंगी समाजसेवा करण्याची आवड असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होवून अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
सध्या ते पिंपरी-चिंचवड पुणे येथे राजपूत समाज संघटनेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत.
कोरोना विषाणू ने राज्यात व देशात थैमान घातले आहे.अशा परिस्थितीत कोरोना विषयी जनजागृती करणे, अडचणीत सापडलेल्या कामगारांना मोफत औषधोपचार , अन्न धान्य वाटप करणे , कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील नागरिकांना मोफत कोरोना चाचणीचे आयोजन करणे असे विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेश लांडगे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या शिफारशीनुसार शासनाच्या कोरोना नियमांचं पालन करत कोरोना चाचणी शिबिरात ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार महेश लांडगे,माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितिन काळजे,भाजपा सहकार आघाडी शहराध्यक्ष प्रदिपकुमार बेंद्रे, स्थायी समिती सभापती ज्ञानेश्वर लांडगे, नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक कुंदन गायकवाड, सरपंच संभाजी आबा घारे,सामाजिक कार्यकर्ते प्रताप भांबे, डॉ. निखिल यादव, डॉ.संतोष पाटील, डॉ. जयश्री काळोखे, निलिमा घुगे, विनायक जाधव, महेंद्र मंडलिक व अनेक मान्यवर उपस्थीत होते.