महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२८:-तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बाळकृष्ण नागो नागपुरे (२६) या युवकाचे आज दि.२६ मार्च रोजी सकाळी चिचोर्डी शेतशिवारातील विहिरीत प्रेतच आढळून आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहमृतक बाळकृष्ण हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा. तो येथील झिंगुजी वार्डात राहात होता. दरम्यान तो दि.२३ मार्चपासून बेपत्ता होता. याबाबतची तक्रार भद्रावती पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. तक्रारीवरून पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.