पर्यावरण मिञ बहु.संस्था भंडारा जिल्हाध्यक्ष एसकेजी पंधरे यांचे पावसासंबंधी पक्ष्यांचे हालचाली वरून संशोधन व अभ्यास
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (१७ जुन) ज्या काळात हवामानाचा अंदाज देणारी यंञणा नव्हती त्या काळी पक्ष्यांचे आवाज आणि पावसाळ्यापुर्वी झाडावर बांधली जाणारी घरटी कोनत्या स्वरुपावरून बांधली यावरून शेतकरी राजा तसेच पर्यावरण प्रेमी पावसांचे अंदाज व्यक्त करित असत.आणि ते खरे ठरवायचे.आता मानवी हस्तक्षेपा मुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून पावसाचे संकेत देणारे कावळ्यांचे घरटे दुर्मिळ होत आहेत.अशी संका पर्यावरण प्रेमी ,एस के जी पंधरे जिल्हाध्यक्ष भंडारा पर्यावरणप्रेमी बहूउद्देशीय संस्था म.सरकार अंगीकॄत यांनी भाकित व्यक्तकेले.पावसाळा सुरू होण्याच्या एक महीन्यापुर्वी कावळ्यांना घरटे विनीचा हंगाम असते.पक्षी या काळात नर मादी झाडावर गोलाखार खोपा (घरटी) बांधण्याला सुरवात करतात. जर कावळ्याने झाडाच्या मधोमध मोठ्या फांद्याला धरून घरटी बांधली तर तर त्या वर्षात वादळा सह पर्जण्यवॄष्टी होण्याचे संकेत मिळायचे.कावळ्याने झाडाच्या टोकाला घरटी बांधली तर पर्जण्यवॄष्टी कमी होण्याचे संकेत मिळायचे.कावळ्याच्या बांधल्या जाणार्या घरट्यावरून पावसाचे अंदाज खरे ठरवायचे. किंवा जर कावळ्याने तोंडात मधेच काळी धरल्यास,मधले नक्षञ बरसा- यचे,चोचीत धरली तर कमी पडायचे.तर यावर्षी सुरवातीलाच पाऊस नाही.शेवटाचे नक्षञ चांगले पडणार असा अंदाज संशोधक पक्षी प्रेमी यांचे सह चर्चेवरून व्यक्त करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस बेसुमार वॄक्षतोड यामुळे हवामानातील उष्माचे प्रमाणही वाढल्याने जंगली पक्ष्यांच्या प्रमाणात घट होवून त्याचा वाईट परिणाम पर्यावरण व पर्जण्यवॄष्टीशी व्यक्त केला जात आहे.पक्ष्यांची संख्या कायम व वाढविण्यासाठी पर्याव- रण पुरक विकास झाडांचे संवर्धन करायला पाहीजेत,नाहीतर पक्षी नामशेष व्हायला कितीसा वेळ लागणार! भविष्यात आपणाला पावसाचे प्रतिकुल- अनुकूल बदलाचे स़केत देणारे पक्ष्यांचे आवाज लुप्त होणार की काय याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.आधुनिकतेत पक्ष्यांचे आवाज व कावळ्यांची घरटी पुस्र्तकातच बघायला मिळतील व आवाज पशु पक्षीप्रेमी अभ्यासक बहुआयामी व्यक्ती किरण पुरंदरे नागझिरा यांचे सारखेच यानंतर काढुन दाखवतील.त्यांना सदर ज्ञान अवगत आहे पक्षी लुप्त होत असल्याने पक्ष्यांचे मंजुळ आवाज लुप्त होत आहे.पक्षांना हवामान व पावसाचे ज्ञान अवगत असते. पाणकोबंळी,पावश्या,मोर,या पक्षांच्या पावसाळ्यापुर्वी अोरड- ण्यावरून पाऊस येणार असल्या चे संकेत मिळत असत. रोहिणी नक्षञ सुरू झाला जून महिण्या- प्रारंभा पासून पक्षी जोरजोरात किलबिल करून एकमेकांना पाठलाग करताना दिसायचे.
विणीच्या हंगामात नर मादीची घरटी बांधण्याची लगबग हे पावसाचे संकेत देते.पण पशु पक्ष्यांच्या शिकार व अवैध वॄक्षतोडीमुळे पक्षी व घरटी नस्ट झाले. कावळ्यांचे कावकाव चिमण्यांची चिवचिव मोरॄंचा केका वॄक्षतोडी मुळे संख्या रोडावली .व आवाज व त्यांचा पहाटेचा मंजुळ स्वर लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे असी निसर्गप्रेमी ,एस के जी पंधरे यांनी खंत व्यक्त आभाळवाटांचे प्रवासी पुस्तकाच्या अभ्यास ,चिंतन व मंथनातून केली.आज पर्यावरण रक्षणाची गरज सर्वाची झाली आहे तरच वॄक्षारोपणासह पक्षी वाढतील व तो पक्ष्याचा पहाटेचा मंजुळ आवाज कानावर येईल व कालांतराने गगणात घुमेल.