संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
स्वामी चिंचोली : दिल्ली येथील ज्युनिपर कंपनीने स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे येथे सोलर प्लांट उभारण्याचे काम चालू केले आहे. त्यातून तयार होणारी वीज ही भिगवण सब स्टेशनला ते विक्री करणार आहेत. त्यासाठी त्यांनी नवले बंगला ते भिगवण सब स्टेशन या दरम्यान वीज वाहतूक करण्यासाठी विद्युत टॉवर लाईन उभा करण्याचे काम चालू केलेले आहे. ही विद्युत टॉवर लाईन उभा करण्यासाठी महापारेषण यांनी कंपनीला १५ कि.मी चे अंतर मंजूर केलेले असताना देखील या कंपनीने केवळ आपले फायद्यासाठी हे अंतर ५ कि. मी मध्ये बसवून शेतकऱ्यांना कोणतीही माहितीन देता सर्वे केलेला आहे. व त्याच सर्वेनुसार विद्युत टॉवर लाईन उभा करण्याचे काम सुरु केलेले आहे. या भागात अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत तसेच शेतकऱ्यांच्या अकृषिक जमनी देखील या भागात आहेत व काही शेतकऱ्यांनी जमिनी अकृषिक करणेकामी अर्ज केलेले असून त्याची कार्यवाही महसूल विभागात चालू असताना देखील कंपनी जबरदस्तीने विद्युत टॉवर लाईनचे काम करून शेतकऱ्यांच्या लाख मोलाच्या जमिनी कायम बाधित करू पाहत आहे. अनेक शेतकऱ्यांनी विद्युत टॉवर लाईन नेण्यास हरकत असले बाबत तहसिलदार, जिल्हाधिकारी यांना लेखी अर्ज केलेले आहे व कंपनीस देखील लेखी कळविलेले आहे. परंतु या कडे महसूल विभागाने देखील पूर्णेपणे दुर्लक्ष केलेले आहे. कंपनीचे अधिकारी देखील शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत.ज्युनिपर कंपनीस विद्युत टॉवर लाईन उभा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असून देखील कंपनी ही शेतकऱ्यांवर जबरदस्ती करीत आहे. कंपनीने विद्युत टॉवर लाईन शेतकऱ्यांच्या चंगल्या जमिनीतूंच विद्युत टॉवर लाईन नेण्याचा घाट घातलेला आहे. कंपनीने विद्युत टॉवर लाईन शेतातून नेण्यास जबरदस्ती केली तर शेतकरी उपोषणास बसतील जर कंपनीने तरीही जबरदस्ती केली तर शेतकरी करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
चौकट.
जबरदस्तीने विद्युत टॉवर लाईन शेतातून नेऊन शेती करीत आहे कायमची बाधित शेतकऱ्यांचा उपोषण व आत्मदहनाचा इशारा






