रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागाव:तालुक्यातील बेलदरी येथील आडे परिवारातील यामीनी नंदु आडे उर्फ गुडिया आडे हि नागपूरच्या माॅटफोर्ट स्कूलची विद्यार्थ्यांनी असुन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई दहावीच्या परिक्षेत नागपूर शहरातुन ९९.२% गुण घेऊन यामीनी हिने राज्यातुन दुसरा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तिने हे यश प्राप्त करुन दहावीच्या परिक्षेत राज्यातुन उंच भरारी घेतल्यामुळे महागांव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरावरुन यामीनी उर्फ गुडिया यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.यामीनी ही महागांव तालुका कृषी विभागामध्ये कृषी सहायक म्हणून कार्यरत असलेले नंदु आडे व सौ.शिल्पा नंदु आडे यांची ती कन्या आहे.आडे यांनी आपल्या कुटुंबासह गेल्या काही वर्षांपासून नागपूर येथे वास्तव्यास राहुन यामीनीच्या शिक्षणावर विषेश लक्ष केंद्रित केले.आई वडिलांच्या मार्गदर्शनासोबतच यामिनीने स्वताच्या मेहनती चिकाटि आणी सातत्याने अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन करुन आपल्या आडे परिवाराचे नांव लौकीक करत मान उंच केले आहे.








