बिभीषण कांबळे
तालुका प्रतिनिधी अर्धापूर
अर्धापूर तालुक्यातील गावोगावी सुरू असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी अर्धापूर पोलीस प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे अवैध धंद्यांची माहिती देणारया ची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत हे धंदे बंद करण्यासाठी लोकसहभाग वाढवा हा यामागे उद्देश आहे त्यासाठी तंटामुक्त समिती पोलीस पाटील सामान्य नागरिकांना माहिती देण्यात आव्हान असलेले पत्रक गावोगावी सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत आहे अर्धापूर ठाणे हद्दीतील गावांमध्ये अवैध दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली तर अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय परिसरातच पान टपऱ्या थाटलया आहेत अवैध व्यवसायांच्या शाखाच ठरत आहेत अवैध धंदे वाढत असल्याने रस्त्यावरील अपघातांसह गुन्हेगारी च्या घटनांमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आणि गुन्हेगारीलाआळा बसावा यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा ही अपेक्षा आहे त्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आलाआहे गावागावात पत्रकाद्वारे पोलिसांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहे नागरिकांनी त्यावर माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केले आहे


