रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
हिवरखेड येथील हेमंत उमेश गावंडे हे दि.16 मार्च 2025 रोजी पत्नी हर्षा व आपल्या अडीच वर्षीय मुलासोबत रेल्वेने आकोट वरूनअकोला गेले असता अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली असता रवी परमार या पर प्रांतीय सराईत,अट्टल गुन्हे गाराने हेमंत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडून पळ काढला.स्व.हेमंत यांनी चोराला पकडण्यासाठी चोराचा पाठलाग केला. पण रात्रीच्या अंधारात तेथील झुडपात रवी परमार या बदमाशाने स्व. हेमंत गावंडे यांच्यावर हल्ला चढविला व त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्या वर दगडाने प्रहार करून त्यांचा निर्घृण खून केला. पोलिसांनी या चोरट्याला अटक केले असले तरी या खूना संदर्भात भव्य मूक मोर्चा व कँडल मार्च काढून सर्वसामान्य शेकडोहिवरखेड वासियांनी या खुणा संदर्भात अनेक मागण्या केल्या आहेत.त्यात नागरिकांच्या प्रमुख मागण्या हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या जावा,याकरिता गावंडे कुटुंबाला चांगला नामांकित सरकारी वकील उपलब्ध करून द्यावा व हल्लेखोराला फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून गुन्हेगारीवर वचक बसेल.ही घटना जेंव्हा घडली तेंव्हा अकोला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म वर एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता.त्या मुळे जे कोणी ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी असतील त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.स्व. हेमंत गावंडे यांच्या पत्नी श्रीमती हर्षा हेमंत गावंडे पोलीस चौकीत गेल्या असता तिथे कर्तव्यावर हजर असलेले अधिकारी अर्चना गाढवे यांनी आरोपीचा पाठलाग न करता स्व. हेमंत गावंडे यांचा फोटो द्या, त्यांचा मोबाईल नंबर द्या अशा विनाकारण च्या चौकशी मध्ये वेळ घाल वला त्यामुळे स्व. हेमंत गावंडे यांचा जीव गेला. या अधिकाऱ्याला सुद्धा सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.
अकोला रेल्वे स्टेशनवरील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून तिथे प्रत्येक प्लॅट फॉर्मवर कमीतकमी दोन पोलीस नियुक्त करावे.
अकोला आकोट रेल्वेमध्ये चिडिमारीचे वा चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे मुली वा महिलांसाठी हा प्रवास असुरक्षित झाला आहे म्हणूनअकोला आकोट रेल्वे प्रवासात रेल्वेमध्ये पोलीस कर्मचारी वाढवून प्रत्येक बोगीत पोलीस नियुक्त करावेत.स्व. हेमंत उमेश गावंडे यांचा जीव रेल्वे पोलीस व प्रशासनाच्या चुकीमुळे गेला असल्यामुळे स्व. हेमंत गावंडे यांची पत्नी श्रीमती हर्षा हेमंत गावंडे ह्यांना रेल्वे किंवा इतर प्रशास कीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे वा त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च रेल्वे विभाग व प्रशासनाने उचलावा.अकोला जिल्ह्याती ल सर्व रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशनचा परिसर गुन्हेगारीचे केंद्र बनलेले आहेत व तिथे अवैध व्यवसाय चालतात यावर कडक कारवाई कर ण्यात येऊन गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यात यावा व हा परिसर प्रवाशांसाठी सुरक्षित करण्यात यावा. तसेच अकोला ते खंडवा मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यातून मध्य रेल्वे कडे तात्काळ हस्तांतरित करण्यात यावा.जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्म व परिसरात सी सी टी वीकॅमेरे बसवण्यात यावे.सदर निर्गुन हत्या करताना इतर आरोपी त्याच्यात सहभागी अस ल्यास त्याची चौकशी करून त्यांनाही फाशीची शिक्षा मिळावी.उपरोक्त अनेक मागण्या करून संबंधित निवेदनाच्या प्रती गावंडे यांचे कुटुंबीय आणि हिवरखेड वासिया तर्फे आकाश फुंडकर,पालकमंत्री अकोला,
खासदार अनुप धोत्रे,जिल्हा धिकारी अकोला,आमदार प्रकाश भारसाकळे आकोट, पोलीस अधीक्षक अकोला, ठाणेदार हिवरखेड. इत्या दींना निवेदने पाठविण्यात आली आहेत.


