सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील रहिवाशी असलेले मानस परितोष कुंडलवाडीकर यांची जवाहर नवोदय विद्यालय शंकर नगर येथे नुकतेच इयत्ता ६ वी साठी निवड झाली आहे. मानस कुंडलवाडीकर यांचे पहिली ते पाचवी पर्यंतचे पूर्व प्राथमिक शिक्षण ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल नांदेड येथे झाले.मानस याने कुठलेही खाजगी शिकवणी न लावता आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्व अध्ययन करून हे यश मिळविले आहे.या यशा मध्ये त्याची आई प्रणाली कुंडलवाडीकर यांचे मोठे योगदान आहे, या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा मॅडम,आई प्रणाली कुंडलवाडीकर, प्रकाश पाटील अर्जुने,अशोक कांबळे, पत्रकार सिध्दार्थ कांबळे,प्रदीप आंबेकर,प्रशांत सब्बनवार,अमरनाथ कांबळे,सुभाष कांबळे,सिद्धार्थ वाघमारे,
आर.पी.वाघमारे,राम हातोडे,धोंडीबा वाघमारे,दीपक वाघमारे,अजय वाघमारे, हेमचंद्र वाघमारे,विवेक वाघमारे,मारोती येलमे,आदीसह आजी,आजोबाव सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


